नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 % पाणी कपात.
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलाशयामधील पाणीसाठयात दैनंदिन घट होत आहे. सदर पाणीसाठा अधिकाधिक काळ नागरिकांच्या उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आणि भारतीय हवामान खात्याने “एल-निनो” व “आयओडी” बाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार कमी मान्सूनचे प्रमाण लक्षात घेता व त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोरबे धरणातून व म.औ.वि.महामंडळाच्या बारवी धरणातून दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 190.890 द.ल.घ.मी. इतकी असून, सद्यस्थितीत मोरबे धरणात प्रत्यक्ष 36.470 द.ल.घ.मी. (19.11%) इतका उपयुक्त जलसाठा आज अखेर उपलब्ध आहे.
या जलसाठयावर महानगरपालिकेचे अत्यंत बारकाईने लक्ष असून, दैनंदिनरित्या नियमितपणे व नियोजनपूर्वक महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, नवी मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. तथापि, वरील संभाव्य कारणे लक्षात घेता यावर्षीसाठीची व पुढील वर्षासाठीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पाण्याचे अचूक नियोजन करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई क्षेत्रात व मोरबे धरण क्षेत्रात नियमित होत असलेली कमाल तापमान वाढ आणि त्या अनुषंगाने धरणाच्या पाण्याचे होणारे कमाल बाष्पीभवन यामुळे 10 टक्केपेक्षा कमी जलसाठा झालेनंतरही पाणीपुरवठा सुरळीत व नियोजनपूर्वक करणे, या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता, खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मोरबे धरणातून सिडको नोड मधील खारघर व कामोठे या सिडको क्षेत्राला सुध्दा 10 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
वरील पाणी कपात ही मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयामधील उपयुक्त जलसाठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत लागू राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची यावर्षीची व पुढील वर्षाची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आठवडयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी बचत करण्याचे महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे.
खालील नमूद विभागात आठवडयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सदरची 10 टक्के पाणी कपात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून अंमलात येईल.
अ.क्र | विभाग | सोमवार दि. 25/05/2026 पासून संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद असणारे वेळापत्रक (वार) |
1 | बेलापूर | सोमवार व गुरुवार |
2 | नेरुळ | मंगळवार व शनिवार |
3 | तुर्भे | बुधवार व रविवार |
4 | वाशी | गुरुवार व सोमवार |
5 | कोपरखैरणे | मंगळवार व शनिवार |
6 | घणसोली | बुधवार व रविवार |
7 | ऐरोली | शुक्रवार - (म.औ.वि.मं.यांच्या संभाव्य गुरूवार व शुक्रवार शटडाऊन असल्यामुळे) |
8 | दिघा | म.औ.वि.मं.च्या शटडाऊन संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे |
वरीलप्रमाणे सिडको नोड मधील खारघर व कामोठे येथे मोरबे धरणातून होणारा पाणी पुरवठा दर शुक्रवारी पूर्णपणे बंद राहील.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र आणि सिडको नोड मधील खारघर व कामोठे येथील सर्व नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नमूद तक्त्यानुसार आवठयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलस्त्रोत व पाणीपुरवठा व्यवस्थेची सातत्यपूर्ण कार्यक्षमता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav